मुंबई- सध्या सगळ्यांनाच कोरोनाच्या विळख्यात सापडायची भीती आहे. प्रकृतीत जरा बिघाड झाला तरी भीती निर्माण होते. अशीच भीती अभिनेत्री मनिषा कोईरालाच्या मनात आली त्याबाबत तिने ट्विटसुध्दा केले आहे.
तिला जरा खोकला झाला होता त्यामुळे तिने कोरोनाची चाचणी करुन घेतली मात्र सुदैवानं ती निगेटिव्ह आली, असं ट्विट केलं आहे. तिच्या या ट्विटवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहे. चाहते याबाबत तिला काही सल्ले सुद्धा देताना दिसत आहे
I coughed a lil n it spooked me so did a test for Covid .. n it negative 😍 🙏🏻
— Manisha Koirala (@mkoirala) October 13, 2020
मनीषा कोईरालाचं वय 50 वर्षे आहे. त्यात ती तिच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांशी सतत संपर्कात राहण्यात्या प्रयत्नात असते.