अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकी अगोदरच एक कोटी लोकांनी केले मतदान!

वाशिंग्टन – अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी एका कोटीपेक्षा अधिक अमेरिकन नागरिकांनी पोस्टल मतदान प्रक्रियेद्वारे मतदान केले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाचे प्रोफेसर मायकल मॅकडोनाल्ड यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या अमेरिका मतदान योजनेतील डेटानुसार ही माहिती समोर आली आहे.

यानुसार अमेरिकेत 1 कोटी 2 लाख 96 हजार 180 लोकांनी पोस्टल मतदानाद्वारे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान केले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा (16 लाख), व्हर्जिनिया (9.77 लाख) आणि मिशीगन (9.65 लाख) येथे सर्वाधिक लोकांनी पोस्टल मतदान केले आहे.

2016 मध्ये झालेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवेळी जवळपास 13 कोटी लोकांनी मतदान केले होते.

व्हिस्कॉनसिन, मिशीगन, पेन्सिल्व्हेनिया, फ्लोरिडा आणि नॉर्थ कॅरोलिनासह पाच प्रांतांत नुकतेच सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेनुसार डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार ज्यो बिडेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा 5 ते 10 गुणांनी पुढे आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.