इंफाळ – मणिपूरमध्ये आज 38 मतदार संघांमध्ये झालेल्या मतदानादरम्यान 78 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
कांगपोकी जिल्ह्यात सर्वाधिक 76 टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक मतदार संघ असलेल्या पश्चिम इंफाळमध्ये 70 टक्के तर पूर्व इंपाळमध्ये 65 टक्के मतदान झाले.
2017 च्या निवडणुकीत मणिपूरमध्ये 86 टक्के इतके आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान झाले होते. मात्र, यावेळी त्यापेक्षाही जास्त मतदान होण्याची शक्यता व्यक्त होत होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काही मतदार केंद्रांवर प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांचा सत्कारही केला गेला. सकाळच्या सत्रापेक्षा दुपारनंतर मतदारांनी रांगा लावून मतदान केले.