Manipur News : मणिपूरमध्ये आज बुधवारी 24 जानेवारी रोजी आसाम रायफल्सच्या एका जवानाने मंगळवारी आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला आहे. मणिपूर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. भारत-म्यानमार सीमेजवळ दक्षिण मणिपूरमध्ये हे प्रकरण समोर आले आहे. या घटनेत सहा जवान जखमी झाले असून हे सर्व मणिपूरचे नसल्याची माहिती देण्यात आले आहे.
या घटनेनंतर आरोपी जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. या सर्व जखमी जवानांना चुराचांदपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत मणिपूर पोलिसांनी सांगितले की, “दक्षिण मणिपूरमधील आसाम रायफल्स बटालियन परिसरात ही घटना घडली. मृत जवान कुकी समाजाचा होता. या संपूर्ण घटनेचा मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्ष किंवा हिंसाचाराशी संबंध नाही.” तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
“There has been an incident of firing by an Assam Rifles Jawan in an ASSAM RIFLES BATTALION deployed close to the Indo – Myanmar border in South Manipur. One Assam Rifles Jawan opened fire on his colleagues injuring six of them (all injured are non-Manipuris); later the… pic.twitter.com/tzIopcHaM9
— Press Trust of India (@PTI_News) January 24, 2024
गोळीबार करणारा जवान चुराचांदपूरचा रहिवासी होता. तो नुकताच सुट्टी संपवून पुन्ही ड्युटीवर आला होता. त्याची तैनाती भारत-म्यानमार सीमेजवळ दक्षिण मणिपूरमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गोळीबारासाठी वापरलेली रायफल जप्त केली आहे. तसेच सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
दरम्यान, “या दुर्दैवी घटनेचा संबंध मणिपूरमधील चालू संघर्षाशी जोडता कामा नये, कारण जखमींपैकी कोणीही मणिपूरचे नाही. वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी घटनेची चौकशी करण्याचे आदेश द्या,” असे पोलिसांनी सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे.