चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा
मॅंचेस्टर – मॅंचेस्टर सीटी संघाने बलाढ्य रेयाल माद्रिदचा 2-1 असा पराभव केला व स्पर्धेच्या विजेतेपदाची दावेदारी आणखी भक्कम केली.
माद्रिद संघाला बचावात केलेल्या चुका चांगल्याच भोवल्या. या स्पर्धेचे 13 वेळा विजेतेपद पटकावणारा माद्रिदचा संघ मॅंचेस्टर सीटीसमोर अत्यंत क्लब दर्जाचाच भासला. या सामन्यात रहिम स्टर्लिंगने 9 व्या मिनिटाला गोल केला व मॅंचेस्टरला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर माद्रिद संघाच्या करिम बेन्झेमाने 28 व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी प्राप्त करून दिली. यानंतर मात्र, माद्रिदला गोल करण्याची एकही संधी मिळाली नाही.
दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर मॅंचेस्टरने आक्रमण वाढवले व खेळात वेगही वाढवला. त्यांच्या आक्रमणासमोर आपला निभाव लागणार नाही हे त्यांनी ओळखले व बचाव भक्कम करण्याचे डावपेच रचले. मात्र, हे सर्व मनसुभे उधळून लावताना गॅब्रियल युशे याने 68 व्या मिनिटाला गोल केला व मॅंचेस्टर संघाला पुन्हा आघाडी मिळवून दिली.
यापूर्वी फेब्रुवारीत झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यातही मॅंचेस्टरने 2-1 असाच विजय मिळवला होता. ही स्पर्धा 2011 सालानंतर पुन्हा एकदा जिंकण्याची सुवर्णसंधी मॅंचेस्टर संघाला मिळाली आहे.