फोर्ड आयकॉनमधून देशी दारुची तस्करी करणारे जेरबंद !

खंडणी विरोधी पथकाची कारवाई

पुणे : फोर्ड आयकॉन कारमधून देशी दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. ही कारवाई तरवडे वस्ती येथे सोमवारी सकाळी करण्यात आली.

अनिकेत रविंद्र कुंभार(24,रा.संभाजीनगर, धनकवडी), राकेश रतन कुंभार(40,रा.धनकवडी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांकडून अडीच लाखाची कार आणि 44 हजाराची 440 लीटर देशी दारु जप्त करण्यात आली. याप्रकरणी पोलिस नाईक अमोल पिलाणे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलिस कर्मचारी उदय काळभोर, शिंदे, नाईक, मंगेश पवार हे अवैध्य धंद्याच्या अनुषंगाने माहिती काढून गस्त घालत होते. हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्यांना फुरसुंगी गावातून मंतरवाडी रस्त्याने धनकवडीकडे एक फोर्ड आयकॉन गाडी जाणार आहे. त्यामध्ये गावठी दारुचे कॅन असल्याची खबर मिळाली.

त्यानूसार फुरसुंगी गावाजवल दोन पथके तयार करुन सापळा रचण्यात आला. संशयीत कार येताना दिसताच तीला अडवण्यात आले. यानंतर त्यातील आरोपींना ताब्यात घेऊन गाडीची झडती घेण्यात आली. याध्ये गाडीच्या डिकीमध्ये सहा हत्ती कॅन, चालकच्या सिटच्या कडेला एक कॅन, मागील सीटवर सहा हत्ती कॅन अशी 440 लीटर देशी दारु पकडण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.