शेफाली जरीवालाच्या 2002 मधील “कांटा लगा…’ या म्युझिक व्हिडीओला खुपच प्रसिद्धी मिळाली होती आणि देशभरात शेफालीला “कांटा लगा’ गर्ल अशी ओळख मिळाली. यानंतर शेफाली “बिग बॉस 13′ मधून घराघरात पोहोचली. या शोमधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.
आता शेफाली पुन्हा एकदा धम्माल करणार आहे. शेफाली जरीवाला आणि पंजाबी गायक मिका सिंह लवकरच एका म्युझिक व्हिडीओमध्ये झळकणार आहेत. मिका सिंहने शेफालीबरोबरच्या या म्युझिक व्हिडीओची झलक शेअर केली आहे.
शेफालीनेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मिका सिंहसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तर मिका सिंहने त्याच्या इन्स्टाग्रामवर गाण्याची झलक दाखविली आहे. मिका सिंहने पोस्ट केले की, प्रिय शेफाली जरीवाला तुझ्यासाठी… बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो, बैठो न दूर हमसे, देखो खफा न हो, किस्मत से मिल गए हो, मिलके जुदा न हो, किस्मत से मिल गए हो, मिलके जुदा न हो, मेरी क्या खता है, होता है ये भी…’
असे या गाण्यचे सूर या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियवर खूप व्हायरल झाला असून त्याला लाखो लाइक्स मिळत आहेत.