#MalaysiaMasters2020 : ‘सात्विक-चिराग’जोडीचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

क्लालालंपूर : भारताच्या सात्विकसाईराज रांकिरेड्डी- चिराग शेट्टी या जोडीला मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव स्विकारावा लागल्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. दुसरीकडे महिला गटात पूजा दांदू-संजना संतोष या जोडीला पात्रता फेरीतच पराभव पत्करावा लागला आहे.

पुरूष दुहेरीच्या सलामीच्या लढतीत मलेशियाच्या आँग येव सिन-तेओ ए यि या जोडीने भारतीय सात्विक-चिराग जोडीचा २१-१५, १८-२१, २१-१५ असा पराभव केला.

दुसरीकडे, महिला दुहेरीच्या पात्रता फेरीत इंडोनेशियाच्या सिती फादिया सिल्वा रामधंती-रिबका सुर्गितो जोडीने भारताच्या पूजा दादू-संजना संतोष जोडीवर २१-१५, २१-१० अशी मात केली. ही लढत ३० मिनिटे चालली.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.