मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत.
अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, अभिनेत्री आपल्या नवीन लूकमुळे पुन्हा एक प्रकाश झोतात आल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतंच अभिनेत्री मलायका अरोरा हिने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बॉलिवूड मधील अनेक बडे कलाकार उपस्थित होते. मात्र, या सगळ्यात सर्वांच्या नजरा फक्त मलायका अरोरावर खिळल्या होत्या.
यावेळी मलायका अतिशय सुंदर आणि नेमीप्रमाणेच हॉट दिसत होती. यावेळी अभिनेत्री डायमंड ज्वेलरी, डिझाईनर ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. रेड कार्पेटवर मलायकाची एन्ट्री होताच तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होत. मलायकाचा हा बोल्ड अंदाज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तिचे फॅन्स देखील मालयकाचं कौतुक करत असल्याचं दिसत आहे.