ज्येष्ठ नागरिकाची ईच्छा मलायकाने मोडली नाही

मलायका अरोरा – खान नेहमीच आपल्या फॅन्सबरोबर अगदी व्यवस्थित वागत असते. तिच्या वागण्या-बोलण्यामध्ये कधीच स्टारपणाचा अहंकार नसतो, असे तिच्या फॅन्सचेच म्हणणे आहे. जर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी मलायकाला कोणी फोटो काढण्याची रिक्‍वेस्ट केली, तर बहुतेक वेळा मलायका ही ईच्छा पूर्ण करते. जर परिस्थिती अगदीच प्रतिकूल असेल आणि तिला घाई असेल, तरच ती नकार देते.

अशाच एका प्रसंगामध्ये मलायकाने भर रस्त्यात तिच्याबरोबर फोटो काढण्याची एका ज्येष्ठ नागरिकाची ईच्छा पूर्ण केली. मलायका एका योगा क्‍लासला गेली होती. कारमधून खाली उतरताच तिच्या जवळ एक ज्येष्ठ नागरिक आले आणि त्यांनी तिला फोटो काढण्याची गळ घातली. त्यांनी आपला मोबाईलही काढून कॅमेरा ऑन करून आणला होता.

अचानक हे “सिनिअर सिटीझन’समोर आल्यावर मलायका क्षणभर गोंधळली. पण स्मित हास्य करून तिनेही फोटो काढण्यास होकार दिला. त्या आजोबांच्या हातातला मोबाईल तिने धरला आणि पटकन एक फोटो काढू दिला.

त्या आजोबांनी तिला आणखी एक फोटो काढण्याची विनंती केली. पण त्यांना “अच्छा टाटा’ करून मलायका आपल्या योगा क्‍लासच्या दिशेने चालायला लागली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.