मुंबई – बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची हॉट गर्लफ्रेंड अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर सुद्धा या जोडीचे लाखो चाहते आहेत. मलायका सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी सुद्धा ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
नवीन वर्षानिमित्त मालयकाने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून, या फोटोत ती आपल्या बॉयफ्रेंड म्हणजेच अर्जुन कपूर सोबत असल्याचे दिसून येत आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, अनेकांनी या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
मलायका आणि अर्जुनची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. आता या दोघांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाला असून, मलायका अर्जुनला खूप मीस करत असल्याचे दिसते. त्यांच्या या दुराव्याचे कारण सुद्धा मालयकाने सांगितलं आहे. खरतरं अर्जुन कपूर करोना पॉझिटिव्ह आहे आणि मलायकाची करोना चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. त्या कारणामुळे हे दोघे नवीन वर्षांच्या निमित्ताने एकमेकांपासून दूर झाले आहेत.
View this post on Instagram
सध्या अर्जुन करोनामुळे क्वारंटाईनमध्ये आहे. यावेळी मलाकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुनचा आणि तिचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत “मी तुला मिस करते आणि मिस्टर पावटी अर्जुन कपूर (माझं पाउट तुझ्यापेक्षा चांगलं आहे.) नवीन वर्षाच्या शुभेच्छा..!!” असे कॅप्शन मलायकाने दिले आहे.