मुंबई – अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचे पती गौतम किचलूने सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. काजलने काल एका चिमुरड्याला जन्म दिला आहे. काजल किंवा गौतम यांनी सोशल मीडियाद्वारे अद्याप याबाबत कोणती माहिती दिलेली नाही. मात्र या गुड न्युज बाबत काजल ची बहीण काजलची बहीण निशा अग्रवाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
निशा अग्रवालने माध्यमांशी बोलतांना सांगितले,”मंगळवारी सकाळी दोघांनी एका सुंदर मुलाचे स्वागत केले.” तिने या बातमीला “सर्वोत्तम” बातमी म्हटले आहे. तसेच आज खूप आनंदाचा दिवस आहे..’
काजलच्या प्रेग्नेंसीची बातमी तिचे पती गौतम यांनी यावर्षी जानेवारीमध्ये जाहीर केली होती. त्यानंतर, अभिनेत्रीच्या पतीने सोशल मीडियावर काजलचा एक फोटो पोस्ट केला होता. “Here is looking at you 2022” अशा कॅप्शनसह त्यांनी एका गर्भवती महिलेचे इमोजी पोस्ट केले होते.