शिक्रापूर -शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतीच्या बांदावरून, सामायिक विहीर, रस्त्यावरून वाद होत असून अनेक ठिकाणचे वाद विकोपाला जात पोलीस ठाण्यातही गेले आहेत. असाच प्रकार धामारी येथे घडला आहे. धामरीत दोन शेतकऱ्यांमध्ये शेतीच्या बांदावरील झाडांवरून वाद होऊन दोघे शेतकरी गंभीर जखमी झाल्याची झाले आहेत.
शिक्रापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विलास कोंडीबा डफळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश डफळ, संदीप डफळ, साधना डफळ, हौसाबाई डफळ, सिद्धेश्वर डफळ, ताराबाई डफळ यांच्यावर तर सुरेश बाजीराव डफळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास कोंडीबा डफळ यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.