सातारा (प्रतिनिधी) – सातारकरांची समाधानकारक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील दोन रुग्णालयातील ५१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील ३८ व कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील १३ अशा एकूण ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेपुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.