शिरूर -चिंचणी (ता. शिरूर) येथे लॉकडाउनच्या नियमांची पायमल्ली करून गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम केल्याप्रकरणी पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. तब्बल 40 जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिरूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.
चिंचणी येथे रविवार (दि. 5) अनिल माणिक पवार, आकाश संभाजी पवार, अमोल सोनबा पवार, दत्तात्रय पांडुरंग पठारे, श्रीकांत हिरामण पवार, प्रेमराज भगवान खुले, गोरख शिवाजी पवार, राजेंद्र आबासाहेब पवार, अनिल सुभेदार पवार, लक्ष्मण बाबासाहेब पवार, संभाजी बाबासाहेब पवार (सर्व रा. चिंचणी) व इतर 30-35 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून, तोंडाला मास्क न लावता, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याने वरील सर्वांवर शिरूर पोलीस ठाण्यात कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.