नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या (दि. 11) सुप्रिम कोर्टात निकाल होणार आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय होणार असून या निकालानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार राहणार की कोसळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राजकीय वर्तुळात उलट-सूलट चर्चांणा उधाण आले आहे.
दरम्यान, पाच न्यायमूर्तीचे खंडपीठ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देणार आहेत. यामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे.