पुणे – प्रशिक्षक काका पवार यांच्या मार्गदर्शनामुळेच मला महाराष्ट्र केसरी किताब जिंकता आला. आता येत्या काळात ऑलिम्पिक पदकही देशाला मिळवून देण्याचे माझे लक्ष्य आहे, अशा शब्दात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेत्या शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) आपला निर्धार व्यक्त केला आहे.
#AxarPatel | केएल राहुलनंतर अष्टपैलू अक्षर पटेलही अडकणार लग्नबंधनात
या किताबासाठी झालेल्या लढतीत शिवराजने महेंद्र गायकवाडला पराभूत केले होते. गेल्या वेळी झालेल्या या स्पर्धेतून शिवराजला खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. यावेळी मात्र, त्याने कठोर मेहनत घेत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. माझे आई-वडील हा सामना पाहण्यासाठी आले नव्हते परंतू या यशाचे श्रेय मी काका पवार यांच्यासह माझ्या कुटुंबियांनाही देतो, असेही शिवराज म्हणाला.
महाराष्ट्र केसरी ठरल्यावर आता मला थांबायचे नसून हेच सातत्य दाखवत देशाला ऑलिम्पिकपदकही जिंकून द्यायचे आहे. आता येत्या काळात तेच लक्ष्य ठेवून सराव व मेहनत करणार आहे. या मौसमात आता आणखी काही स्पर्धा होणार असून त्यातही यश मिळवत ऑलिम्पिकचीही तयार करणार आहे, असेही शिवराजने म्हटले आहे.