केळगावचा आदर्श आखाडा गाजवणार
चिंबळी – खेड तालुक्यातून महाराष्ट्र केसरी निवड चाचणीसाठी केळगाव येथील आदर्श गुंडची निवड झाली असल्याने मरकळ ग्रामस्थांच्यावतीने त्याचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक संजय मोहिते, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, जिल्हा परिषद सदस्या दिपाली काळे, सभापती बाळशेठ ठाकूर, कैलास सांडभोर, शांताराम सोनवणे, विलास कातोरे, अमित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मरकळ (ता. खेड) येथे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघांच्या मान्यतेने खेड तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा सागर लोखंडे, महापौर केसरी तथा महाराष्ट्र चॅम्पीयन सचिन लोखंडे, महाराष्ट्र चॅम्पीयन निखील लोखंडे, अनिकेत लोखंडे, चिक्या शिंदे, रोशन लोखंडे, राहुल लोखंडे, किरण शिंदे आदी मान्यवरांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे पंच म्हणून पै. काळूराम लोखंडे, दिनेश गुंड यांनी काम पाहिले, तर समालोचन नवनाथ लोखंडे यांनी केले.
यात विविध वजनी गटनुसार माती व गादी विभागांत या स्पर्धा पार पडल्या. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे; माती विभाग : 50 किलो : विजय थोरवे, 61 किलो व ग.वैभव मेदनकर, 65 किलो : हर्षद घोलप, 70 किलो : अरूण खेंगले, 74 किलो : जुवेद शेख, 79 किलो : कार्तिक कुऱ्हाडे, 86 किलो : तेजस लोखंडे, 92 किलो : साहिल गाडे, 97 किलो : आकाश करेजेकर, 125 किलो : आकाश खेंगले. गादी विभाग : सुनील निधन, प्रकाश डोंगरे, गोरक्ष लोखंडे, षीकेश गाडे, संदिप मोहिने, नदंकुमार लोणारी, नवनाथ राक्षे, ओंकार पवार, मंगेश ठाकूर.