मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज (दि.25) दुपारी दोन वाजता जाहीर करण्यात येणार आहे. काही वेळातच निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांची धाकधुक अधिकच वाढली आहे. बारावीनंतरच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा असल्याने विद्यार्थ्यांसह पालकही या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र निकाल पाहताना तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. यासह तुम्ही hsc.maharesult.org.in किंवा hscresult.mkcl.org यावर देखील निकाल पाहू शकता.
ऑनलाईन निकाल या पद्धतीने पाहता येईल
>> mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाऊन HSC result 2023 या लिंकवर क्लिक करा.
>> तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाका. यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल.
>> तुम्ही त्या PDF ची प्रिंटआऊट देखील काढू शकता.
SMS द्वारे पाहता येणार निकाल
SMS द्वारे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागेल. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल. ऑनलाइन निकाल लागल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थ्यांना त्यांचे ओरिजिनल मार्कशीट कॉलेजमधून मिळणार आहे.
या गोष्टी लक्षात ठेवा-
- निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचं नाव महत्वाचं असणार आहे.
- जर तुमच्या रोल नंबरवरून तुमचा रिझल्ट दिसत नसेल तर तुमच्या आईच्या नावाने तुम्हाला रिझल्ट बघता येईल.
- निकाल बघताना तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन बरोबर आहे ना याची खात्री करून घ्या.
- निकाल हा लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरच पाहण्याचा प्रयत्न करा.
- ऑनलाईन निकाल बघताना पुढील गोष्टी काळजीपूर्वक पाहा –
तुमचा रोल नंबर, तुमचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंग, सर्व गुणांची बेरीज इत्यादी.