मुंबई – टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या अभिनयासाठीच कमी आणि हॉटनेससह तिच्या फिटनेसमुळेही अधिक चर्चेत असते. श्वेताने आपल्या करिअरची सुरुवात भलेही छोट्या पडद्यापासून केली असेल, पण आज तिने बॉलिवूडसह भोजपुरी आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील आपली खास ओळख निर्माण केली आहे.
श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतच तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिचा फिटनेस आणि स्टाईल पाहून चाहहते देखील अवाक झाले आहेत.
42 वर्षीय श्वेता तिवारीने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये श्वेता बेज रंगाच्या ब्रॅलेट चोली आणि लांब फ्लोय स्कर्टमध्ये सुंदर दिसत आहे. या इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये श्वेताने पुन्हा चाहत्यांची मने जिंकली आहेत. श्वेताने परिधान केलेली ही ब्रॅलेट स्टाईल चाहत्यांना चांगलीच आवडली आहे. यासह अभिनेत्रीने तिच्या गळ्यात अतिशय सुंदर नेक पीस कॅरी केला आहे. हेअर स्टाइलबाबत बोलायचे झाल्यास श्वेताने केस मोकळे सोडले आहेत. ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.
View this post on Instagram
शेताच्या या फोटोने सोशल मीडियावर असाक्षरशः आग लागली आहे. यावर कमेंट करून केवळ चाहतेच नाही तर अनेक स्टार्सही त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. यावेळी चाहत्यांनी तिच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. “ती 42 वर्षांची आहे, पण 22 वर्षांची वाटते” अशी कमेंट एका चाहत्याने यावेळी केली आहे. तर आणखी एकाने ‘लूक लाईक कॉलेज गर्ल’ असं म्हंटल आहे.