बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी सेटवर वापसी केली आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा कामावर परतल्याने अमिताभ बच्चन यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एका फोटोचा कोलाज ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्यात त्यांच्या विविध छटा दिसून येत आहे.
बिग बी यांनी याला कॅप्शन देत लिहिले की, “यो..हो!!! बॅक टू ग्राउंड ऍण्ड वर्क, 4 कॅम्पेन फिल्म्स, 5 ऑउटफिट चेंज, 4 स्टिल शूट. दिवसातील पाच तास. माझ्याशिवाय अन्य सर्वजण असे दिसत आहे की, जसे ते “हीस्ट’ करण्यासाठी तयार आहे. उद्या केबीसीसाठी तयार आहे.
वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अतिमताभ बच्चन सध्या “कौन बनेगा करोडपती’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेत केबीसीची शूटिंग सुरू करण्यात आली आहे.
याशिवाय बीग बी लवकरच “झुंड’, “चेहरे’ आणि “ब्रह्मास्त्र’ चित्रपटातही झळकणार आहे. “झुंड’मध्ये अमिताभ बच्चन हे एका प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. यात ते पहिल्यांदाच इमरान हाश्मीसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.