Mahadev Betting App : महादेव बेटिंग अॅप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे नाव अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आरोपपत्रात आल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीच्या हाती इलेक्ट्रॉनिक पुरावा लागला असून या प्रकरणात ईडी लवकरच भूपेश बघेलला समन्स पाठवू शकते, असे सांगण्यात येत आहे.
ईडीला असीम दासच्या मोबाईल वरून 29 सेकंदाचा रेकॉर्ड केलेला ऑडिओ संदेश मिळाला आहे. शुभम सोनी याने दुबईत बसून असीमला हा संदेश पाठवला होता. या इलेक्ट्रॉनिक पुराव्यामुळे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणी वाढू शकतात. व्हॉईस नोटद्वारे पाठवलेल्या या ऑडिओ संदेशात शुभम सोनी असीमला म्हणत आहे, “भाऊ, एक काम करा, आता भारतात जा, तिथून मला पैशांसाठी कॉल आणि मेसेज येत आहेत. मी तुम्हाला रायपूर शाखेतून 8 वाजता तिथे पाठवतो. मी तुम्हाला 10 कोटी रुपये देत आहे, तुम्ही ते भूपेश बघेल जवळ द्यावेत” असे यात म्हटले गेले आहे.
ईडीने अटक केलेला आरोपी असीम आणि दुबईत बसलेला महादेव अॅपचा तथाकथित आरोपी शुभम सोनी, असीमच्या मोबाईल फोनमधील व्हॉट्सअॅप चॅटमधून ईडीने ही ऑडिओ नोट जप्त केली आहे. या व्हॉट्सअॅप चॅटच्या ऑडिओ नोट आणि शुभम सोनी यांनी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिलेल्या वक्तव्याच्या आधारे ईडी लवकरच तत्कालीन एसपी प्रशांत अग्रवाल आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना समन्स पाठवण्याची तयारी करत आहे.
ईडीच्या तपासानुसार या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ सुनील दममानी, अनिल दममानी, छत्तीसगड पोलिसांचे एसआय चंद्रभूषण वर्मा, एक कॉन्स्टेबल भीम सिंग, कुरिअर कर्मचारी असीम दास आणि सतीश चंद्राकर यांचा समावेश आहे. दरम्यान, महादेव बेटिंग अॅप दुबईमध्ये बसून सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल, भिलाई, छत्तीसगड येथील रहिवासी चालवत होते. हे दोघेही महादेव बेटिंग अॅपचे प्रमोटरही आहेत.