पुणे – पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील रहिवाशांसाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या महाबॅंक ग्रामीण स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कारागृहे ) अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या महाबॅंक ग्रामीण स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून कारागृहातील सहवासींचे पुनर्वसन व सामाजिक समावेशन सुलभ करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सुरवातीला सुमारे 100 कारागृहवासींसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. बॅंकेचे कार्यकारी संचालक ए बी विजय कुमार, पोलीस उपमहानिरीक्षक (कारागृहे )योगेश देसाई, बॅंकेच्या पुणे पूर्व विभागीय कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक विवेक धवन, येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले या कार्यक्रमास उपस्थित होते.