हडपसर – हडपसर-हांडेवाडी रोडवरील गंगा व्हिलेज सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत गंगा व्हिलेज परिवार पॅनेलने १९ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर, सत्ताधारी प्रगती पॅनेलला एकही जागा राखता आली नाही.
हडपसर विधानसभा मतदार संघातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागुन असलेल्या गंगा व्हिलेज को-ऑप हौसिंग सोसायटीच्या २०२१ ते २०२६-२७ साला करिता झालेल्या पंचवार्षिक
निवडणुकी मध्ये सभासदांनी सत्ताधारी यांना धक्का देत “गंगा व्हिलेज परिवार
पॅनलच्या” सर्वच्या सर्व १९ जागा सभासदांनी मोठया फरकाने निवडुन दिलेल्या आहेत.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन विजयसिंह दत्तात्रय माळवदकर यांनी काम पाहिले. गंगा व्हिलेज सोसायटी मध्ये ६७२ सभासद असून सुमारे सत्तर टक्के म्हणजे ३३६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.त्यात प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांचा मोठया फरकाने पराभव करत गंगा व्हिलेज परिवार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. योगेंद्र गायकवाड,रवि बरणवाल,दिलावर शेख,संजय पवार, संतोष कारंजकर,अकुंश जाधव,डॉ. अनिल पाटील, मोहन
मोरे,रोहिदास सायकर,विवेक मुळे, नितेश गद्रे,मधुकर जगताप, प्रकाश खांडेकर,रतन कुंडू,गणेश हरि पाटील,श्रीकृष्ण ताजने,सुनिल गव्हाळे,व महिला राखीव गटामध्ये ज्योत्स्ना बरणवाल,रंजना रणपिसे विजयी झाले आहेत.
गणेश नारायण वाडकर,वसिम फरास ,उमेश परदेशी आणि मधु मेनन यांनी पॅनेल प्रमुख म्हणून धुरा सांभाळली तसेच गंगा व्हिलेज को-ऑप हौसिंग सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी दिपक जंवजाळ यांनी काम पाहिले.