नवी दिल्ली – करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरीएंटमुळे जागतिक बाजारात अनिश्चित परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे काही प्रमाणात वळत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 58 रुपयांनी वाढून 47,039 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 175 रुपयांनी वाढून 60,362 रुपये प्रत्येक किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,781 डॉलर प्रति औंस व चांदीचे दर वाढून 22.42 डॉलर प्रति औंस झाला.