पिंपरी – महाविकास आघाडीच्यावतीने शहरात नागरिकांची महासभा घेण्यात येणार आहे. याबाबत तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची महासभा 17 मार्चपर्यंत सत्ताधारी भाजपने तहकूब केली आहे. मात्र 13 मार्चलाच सर्व नगरसेवकांची मुदत संपत आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांवर चर्चा टाळण्यासाठी तसेच निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून भांडाफोड होईल या गोष्टीला घाबरून पळ काढला आहे. मुदत संपत असल्याचे माहित असूनही त्यांनी 17 मार्चपर्यंत सभा तहकूब केली, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला असून शनिवारी (दि. 12) जनतेची महासभा महाविकास आघाडी
गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. शेवटच्या सभेत भाजपला विरोधकांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागणार होते. त्यामुळे भाजपने काढताय पाय घेतला. मात्र जनतेच्या महासभेत या सगळ्या गोष्टी उघड होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे.
– सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना.
भ्रष्टाचाराच्या मुद्यात अनेक पदाधिकारी सामील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहराची प्रतिमा मलिन झाली आहे. भाजपच्या पाच वर्षांच्या कारभारावर या जनतेच्या महासभेत चर्चा करण्यात येणार आहे.
– कैलास कदम, शहराध्यक्ष, कॉंग्रेस.