मुंबई – राज्यातील पुढील विधानसभा निवडणुकीत (2024) महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाहीत अशी स्थिती निर्माण करण्याची इच्छा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी म्हटले. त्यातून महाविकास आघाडीला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा भाजपचा संकल्प समोर आला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचा त्या आघाडीत समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार प्रभावी कार्य करून दाखवेल. त्यामुळे 2024 मधील निवडणुकांत आम्ही राज्यात लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 200 जागा जिंकून दाखवू, असा विश्वास बावनकुळे यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलून दाखवला. भाजप आणि इतर पक्षांमधील तफावत दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
हिमाचलमध्ये निवडणुक जाहीर होताच आला ‘हा’ सर्वे; पुन्हा भाजपचीच सत्ता येणार? https://t.co/bfrmYzYHxQ
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 14, 2022
प्रभावी नेत्यांशी नाते असेल तरच इतर पक्षांत वरचे पद मिळते. त्याउलट, भाजपमध्ये केवळ पात्रता उपयोगी ठरते, असे म्हणत त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण दिले. माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही. तरीही मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनलो, अशी पुस्तीही बावनकुळे यांनी जोडली.