‘क्रॅकर’ या गुन्हेगारीशी संबंधित ब्रिटीश मालिकेत आणि ‘हॅरी पॉटर’ चित्रपटांच्या सेरीजमधील आपल्या अभिनयामुळे जगभरात प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ स्कॉटिश अभिनेते रॉबी कोलट्रेन यांचे आज वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. कोलट्रेन यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात कॉमेडी आणि थिएटरपासून केली, कोलट्रेन हे जेम्स बाँड सिरींजमधील दोन चित्रपटांमध्ये देखील झळकले आहेत.
कोल्ट्रेनचा यांचा जन्म 30 मार्च 1950 रोजी ग्लासगो, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर तर आई शिक्षकाचा होत्या. ग्लासगो आर्ट स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर, त्यांनी एडिनबर्गमधील मोर हाऊस कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये कला विषयाचा पुढील अभ्यास सुरू ठेवला.
कलाकार बनण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याने त्यांनी एडिनबर्ग क्लबमध्ये स्टँड-अप कॉमेडीला सुरूवाट केली. अभिनय क्षेत्राकडे वळताना त्यांनी जॅझ लिजेंड जॉन कोलट्रेनच्या सन्मानार्थ स्वतःचे आडनाव बदलले होते. व्यासायिक जीवनात त्यांना रॉबी कोलट्रेन नावाने ओळखले जात असले तरी त्यांचे खरे नाव अँथनी रॉबर्ट मॅकमिलन असे होते.