ग्वाल्हेर – मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर एका सरकारी कार्यक्रमादरम्यान स्टेजवरुन खाली पडले. या दुर्घटनेत त्यांना मुका मार लागला. तोमर राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या कार्यक्रमासाठी ग्वाल्हेरमध्ये आले होते. यावेळी दुर्घटना झाली.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, मध्य प्रदेशचे मंत्री भारत सिंह कुशवाह, खासदार विवेक शेजवलकर, नेते प्रभात झा उपस्थित होते. कार्यक्रमासाठीचे स्टेज दहा फूट रूंदीचे होते. या स्टेजवर मंत्री आणि नेते उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू झाला त्यावेळी स्टेजवर जवळपास 25 जण उपस्थित होते. याचवेळी मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांचा तोल गेल्याने ते अचानक खाली पडले. त्यांना मुका मार लागला. प्रद्युम्न तोमर मंचावरून खाली पडताच कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ उडाला. उपस्थित नेते, कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षक प्रद्युम्न तोमर यांना सावरण्यासाठी धावले.
याआधी भोपाळमध्ये वीज विभागाच्या ऑफिसबाहेर ट्रान्सफॉर्मरजवळ उगवलेले गवत ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी स्वतः जाऊन काढले होते. सरकारी ऑफिसमधील अस्वच्छता पाहून लगेच स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे ते चर्चेत राहिले आहेत.
रहदारीचे नियम मोडल्यानंतर दंड भरणे, मुलाची चूक झाल्यावर त्याला पोलिसांकडे नेऊन माफी मागायला लावणे; यामुळेही मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्न सिंह तोमर चर्चेत राहिले.