रब्बी हंगाम जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत बारामतीच्या महिला शेतकरी छाया पवार प्रथम

हरभऱ्याचे घेतले हेक्टरी 34 क्विंटल उच्चांकी उत्पादन

बारामती :- पुणे जिल्ह्यातील सन 2020-21च्या रब्बी हंगाम जिल्हास्तरीय पीक स्पर्धेत हरभऱ्याचे हेक्टरी 34 क्विंटल उच्चांकी उत्पादन घेऊन बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथील महिला शेतकरी छाया तानाजी पवार यांनी सर्वसाधारण गटातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. कृषी दिनी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे यांनी दिली.

कुरणेवाडी ता. बारामती येथील महिला शेतकरी छाया तानाजी पवार यांनी हरभरा पीकाचे हेक्टरी 34 क्विंटल उच्चांकी उत्पादन घेऊन जिल्ह्यात रब्बी हंगाम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

कृषी दिनी पुणे विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. बारामती तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तानाजी पवार यांच्या त्या पत्नी आहेत. या पीक स्पर्धेत हरभरा पीकामध्ये भरघोस उत्पादन घेण्यासाठी त्यांना उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषि अधिकारी दतात्रय पडवळ यांनी मार्गदर्शन केले. महिला शेतकरी छाया पवार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.