भोपाळ – झोपेत विषारी किडा चावल्याने संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत वडिल आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.
शहडोल जिल्ह्यातील कोठी ताल गावात लाल पालिया आपल्या लहान मुलांसोबत राहत होता. शनिवारी लाल पालिया आणि त्यांची मुलं संजय (5) आणि शशी (3) हे तिघे घरात झोपले होते. अचानक तिघांना अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यांना रात्रीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
शवविच्छेदनानंतर त्यांना विषारी किडा चावल्याने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.