वाघोली(प्रतिनिधी) : सार्वजनिक जागांवर नागरिकांच्या हिताचे प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केले.
वाघोली ग्रामपंचायत माध्यमातून वार्ड क्र.4 संत तुकाराम नगर येथील 4 कोटी रुपयांचा पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच 1000 वृक्षलागवड संवर्धन अभियानाच्या दुसऱ्या टप्प्या तील वृक्षारोपण आणि 1200 डस्टबीन वाटप कार्यक्रम वाघोली तालुका हवेली येथे माजी आमदार जगदीश मुळीक, माऊली कटके यांच्या हस्ते संपन्न झाला.त्यावेळी मुळीक बोलत होते.
“वाघोली मधील वार्ड क्रमांक ४ मधील समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करून सदस्यांनी विकासकामे मार्गी लावून एक नवा आदर्श उभा केला आहे.
– अनिल सातव पाटील(हवेली तालुकाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा)
याप्रसंगी दादासाहेब सातव पाटील,रामकृष्ण सातव पाटिल,प्रसाद सातव पाटिल ,संतोष खांदवे,वसुंधरा उबाळे, मीना सातव पाटिल ,कविता दळवी,सुनील जाधवराव,शिवदास उबाळे,समीर भाडळे,पिंटू कटके,महेंद्र भाडळे, जयप्रकाश सातव पाटिल, प्रदीप सातव पाटिल, केतन जाधव,आदित्य खांदवे,गणेश सातव, विजय जाचक, मारुती गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.