भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये उज्जैनमध्ये राहणाऱ्या एका 65 वर्षीय महिलेचा कोरोनाच्या बाधेमुळे मृत्यू झाला. ही महिला इंदूरच्या एम वाय रुग्णालयात उपचार घेत होती. तेथेच तिला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.
या महिलेवर उज्जैन येथे उपचार केल्यानंतर त्यांना इंदूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे देशातील बळींची संख्या 13 वर पोहोचली आहे.
तत्पुर्वी, मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा राजीमामा राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे सोपवण्यापूर्वी कमलनाथ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या एका वार्ताहराला कोरोनाची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पत्रकार परिषदेला अनेक आमदार आणि दिल्लीहून या राजकीय घडामोडीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते. सरकारच्या माहिती जनसंपर्क विभागातील अनेक अधिकारीही उपस्थित होते. या पत्रकाराची कन्या ही अलीकडेच लंडनहून दिल्ली मार्गे आली होती. तिच्यासोबत दिल्लीहून भोपाळला शताब्दी एक्सप्रेसने आलेल्या तिच्या भावाची चाचणी निगेटिव्ह आली आहे. इंदूरमध्ये पाच जण बाधीत आढळल्याने तेथे संचारबंदी लादण्यात आली आहे.