-->

न्यायमूर्ती वंदना कसरेकर यांचा करोनाने मृत्यू

इंदूर – मध्यप्रेशातल्या इंदूर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती वंदना कसरेकर यांचा रविवारी करोनामुळे मृत्यू झाला. काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एअर लिफ्ट करून दिल्लीला उपचारासाठी हलविण्यात येणार होते.

मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना शिफ्ट करणे शक्‍य नसल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली.
कसरेकर यांना निवृत्तीसाठी एक वर्षाचा अवधी होता. मात्र त्या आधीच त्यांचे निधन झाले.
इंदूरमधील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांची करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली होती.

तसेच वय आणि त्यांना असलेल्या इतर व्याधींमुळे त्यांची प्रकृती खालावत गेली. यानंतर मल्टिऑर्गन फेल झाल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही, अशी माहिती कोविड नोडल अधिकारी अमित मालाकार यांनी दिली.

सध्या इंदूर खंडपीठातील त्या एकमेव महिला न्यायाधीश होत्या. या पदावर त्यांची ऑक्‍टोबर 2014मध्ये नियूक्‍ती करण्यात आली होती आणि जुलै 2022मध्ये त्या निवृत्त होणार होत्या. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कसरेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

दरम्यान, 8 दिवसांमध्ये देशातील दोन उच्च न्यायातयातील न्यायमूर्तींचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जीआर उधवानी यांचे 5 डिसेंबर रोजी निधन झाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.