मध्य प्रदेश सरकारची करोना मृतांच्या आकडेवारीत लपवाछपवी; फोटोमुळं पितळ उघडं

भोपाळ – देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. देशातील अनेक रुग्णालयं रुग्णांनी भरली असून रुग्णाला बेड मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर दिसत असला तरी आता इतर राज्यातील स्थिती भयावह असल्याचं समोर येत आहे. मध्य प्रदेशात करोना रुग्णांची आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी लपविण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. व्हायरल झालेल्या एका फोटावरून येथील सरकार लपवाछपवी करत असल्याचं समजतं.

ड्रोन कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोत भोपाळच्या भदभदा विश्राम घाट येथे 40 चिता जळताना दिसत आहेत. प्रशासनानं मात्र गुरुवारी कोरोनामुळं केवळ 4 मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त दिलं आहे. भोपाळमध्ये सरकारचे आकडे आणि प्रत्यक्ष समोर येणारे आकडे यांच्यात मोठी तफावत असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.


प्रशासनं करोनाची लागण होणाऱ्या रुग्णांचे आकडे लपवले असून आता मृत्यूची आकडेवारीही लपवत असल्याचंही यात म्हटलं आहे. मीडिया अहवालानुसार कोव्हिड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जात असूनही आकडे वेगळे येत आहेत. व्हायरल झालेला फोटो हृदय पिळवटून टाकणार असून त्यात ४० चिता जळताना दिसत आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.