वाघोलीतील कोविड सेंटरसाठी जास्तीत जास्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी देणार – आमदार अशोक पवार

वाघोली – वाघोली तालुका हवेली येथील वाघोली  कोविड केअर सेंटर  ला शिरूर हवेली चे आमदार अशोक पवार यांनी भेट देऊन पहाणी केली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री  अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कोरोना प्रसार रोखण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत.

वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्र व को विड सेंटर साठी वाढीव वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत  जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी यांना  आमदार अशोक पवार यांनी सूचना केल्या आहेत. तसेच  सद्यस्थितीत अजून  एक कोविड केअर सेंटर उभारण्याबाबत  देखील आदेश दिले गेले  असल्याची माहिती शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली आहे.

वाघोली मधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून वाघोली मधील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी आरोग्य सुविधा व  करण्यात येत असलेल्या आरोग्य उपाय योजना याबाबत आमदार अशोक पवार यांनी अधिकारीवर्ग यांच्याबाबत समाधान व्यक्त केले असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिली.

याप्रसंगी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, अपर तहसीलदार विजयकुमार चोबे, हवेली तालुका गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड, वाघोली सोसायटी असोसिएशनचे प्रतिनिधी संजीवकुमार पाटील, शाखा अभियंता बाळासाहेब मखरे, वाघोली चे ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.