MP Polls 2023 – मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) उमेदवाराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मतदारांना लाच दिल्याच्या आरोपाखाली मुरैना मतदारसंघातील बसपा उमेदवार राकेश सिंह यांच्याविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये माजी आयजी आणि मंत्री रुस्तम सिंह यांचा मुलगा राकेश सिंह काही लोकांना पैसे वाटताना दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग सर्व्हिलन्स टीमचे प्रभारी दिनेश कुमार यांनी व्हिडिओच्या आधारे राकेश सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अधिकाऱ्यांकडून तपास सुरू –
दिनेश कुमार म्हणाले की, कोतवाली पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 188 आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 123 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अधिकारी या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत.
दरम्यान, 230 सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेसाठी शुक्रवारी (दि. 17) मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर 3 डिसेंबरला इतर चार राज्यांसह मध्य प्रदेशच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.