मुंबई – बॉलीवुड की धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये माधुरीने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे,’मुंबईत वडापावपेक्षा चांगल्या स्वागताचा विचार करू शकत नाही’ या फोटोमध्ये माधुरी आणि टीम कुकच्या हातात वडा पाव दिसत आहे.
दरम्यान, टेबलवर आणखी काही पदार्थ दिसत आहेत. माधुरीच्या या पोस्टवर लोक जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. एका युजरने म्हटले आहे, एक युजर्सने लिहिले आहे,’वाह माधुरी जी, आता पुढचे वडापावचे दुकान सिलिकॉन व्हॅलीमध्ये उघडणार’ मात्र, माधुरीच्या या पोस्टवर टीम कुकनेही प्रतिक्रिया दिली आहे, आणि लिहिले- माधुरी दीक्षित मला माझ्या आयुष्यातील पहिला वडा पाव खायला दिल्याबद्दल धन्यवाद, वडापाव खूप चवदार होता.
मुंबईतील स्वाती स्नॅक्स या आलिशान फूड आउटलेटमध्ये माधुरी आणि ऍपलचे सीईओ टिम कुकने या वडा पावाचा आस्वाद घेतल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की टिम कुकने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी सुद्धा भेट दिली होती.