मुंबई – ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर मंगळवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
Just heard about the sad demise of legendary actor #ShreeramLagoo ji. May his soul rest in peace.
— Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) December 19, 2019
आज पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. निधनानंतर कलाविश्वातीलच नव्हे तर राजकारण, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यातच डॉ. श्रीराम लागूंच्या निधनावर शोक व्यक्त करत, अभिनेत्री माधुरी दीक्षित हिनेही एक ट्विट केले. पण या ट्विटनंतर लगेच ती ट्रोल झाली.
झोपेत होती वाटतं. उशिरा जाग आली.
— Vikas Jadhav (@vikasjadhav4545) December 20, 2019
दरम्यान, दोन दिवसानंतर माधुरीने ट्विट केले की, ‘दिग्गज अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाबद्दल आत्ताच ऐकले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ, सध्या या ट्विटवर काही युजर्सनी रिट्विट करत चांगलीच शाळा घेतली आहे. काही युजर्सनी ‘झोपेत होती वाटतं. उशिरा जाग आली’ असं म्हणत चांगली ट्रोल केले आहे.