मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात अहमदाबाद व लखनौ हे दोन नवे संघ सहभागी होत आहेत. यातील लखनौ संघाचे नामकरण लखनौ सुपर जायंट्स असे करण्यात आल्याची माहिती, संघाचे मालक संजिव गोयंका यांनी दिली आहे.
लखनौ हा संघ विकत घेतल्यावर त्यांनी या संघासाठी एक नाव सुचवण्याचे आवाहन केले होते. यापूर्वी गोयंका यांच्या आरपी समुहाने 2017 साली पुणे संघ विकत घेतला होता व त्याचे नामकरण रायझींग पुणे सुपरजायंट्स असे केले होते.
And here it is,
Our identity,
Our name…. 🤩🙌#NaamBanaoNaamKamao #LucknowSuperGiants @BCCI @IPL @GautamGambhir @klrahul11 pic.twitter.com/OVQaw39l3A— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 24, 2022
दरम्यान, लखनौ सुपर जायंटचे नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करणार आहे. तर या संघाचे मार्गदर्शकपद गौतम गंभीरकडे सोपवण्यात आले आहे. लोकेश राहुल हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरणार असल्याचे समोर आले आहे. राहुल याला लखनऊ फ्रँचायझीने 17 कोटी रुपये मोजले आहेत. यासह राहुल आयपीएल 2022 चा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.