चिदंबरम यांना 61 दिवसांनी जामीन

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यावेळी दोन सदस्यीय खंडपीठाने त्यांना जामीन देण्यास विरोध करणारे सीबीआयचे मुद्दे फेटाळून लावले.
खंडपीठाचे प्रमुख पी चिदंबरम म्हणाले,, चिदंबरम यांच्यावर घातलेले निर्बंध पाहता ते देशाबाबहेर पळून जाण्याची कोणतीही शक्‍यता नाही. तसेच ते या खटल्यापासून दूर राहण्याची शक्‍यता नाही हा चिदंबरम यांच्या वकीलांचा मुद्दा मला मान्य आहे. कारण चिदंबरम यांनी पारपत्र जमा केले आहे. या शिवाय त्यांच्यावर लुक आउट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ते देशाबाहेर जाण्याची शक्‍यता वाटत नाही.

चिदंबरम यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपील सिब्बल आणि अभिषेक मनु संघवी यांनी काम पाहिले. चिंदबरम हे साक्षिदारांवर प्रभाव टाकू शकतात, त्यामुळे त्यांना कारागृहात ठेवणे आवश्‍यक असल्याचा सीबीआयचा दावाही सर्वोच्च न्यायलयाने फेटाळून लावला; सुमारे 61 दिवस कारागृहात असणाऱ्या चिदंबरम यांना प्रथमच जामीन मंजूर झाला आहे. सध्या ते इडीच्या कोठडीत आहेत.
जामीन मंजूर करताना अथवा नाकारण्यासाठी प्रस्थापित तत्वांकडे उच्च न्यायलायचे दुर्लक्ष झाले असून त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन केवळ आरोपाचे गांभीर्य आणि स्वरूप यांवर आधारित होता, असे निरीक्षणही न्यायलयाने नोंदवले.

Leave A Reply

Your email address will not be published.