भोर – अडचणींच्या काळात राष्ट्रवादीत पक्ष संघटनेबरोबर राहिलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. आपल्या पक्षाची ताकद कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
भोर तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांच्या उपस्थितीत संगमनेर (ते. भोर) येथे कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.
खासदार सुळे म्हणाल्या की, तुम्ही दमदार काम करा की तुमचं काम पाहून पक्ष तुम्हालाच तिकीट, पद देईल. करोना काळात महाविकास आघाडीने नियोजनबध्द कामे दीड वर्षे केले आहे. जनतेची सेवा करण्यासाठी महाविकास आघाडी वचनबद्ध आहे. राष्ट्रवादीची सत्ता असलेली सातारा व पुणे जिल्हा परिषद राज्यात चांगले काम करत आहे. केंद्राचा अहवाल सांगत आहे. ओबीसी आरक्षणाचा पुढील आठ दिवसांत निर्णय होईल. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी भोर पंचायत समिती सभापती निवडीवेळी व्हिप डावलला म्हणून तीन सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे म्हणाले की, सर्वसामान्य माणसात जाणारा पक्ष राष्ट्रवादी आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मदतीने कोविड सेंटर सुरू करून चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक सामाजिक कामे पक्ष संघटनेच्या मदतीने केली आहेत. राज्य सरकारमार्फत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना जादा भरपाई देण्याचा निर्णय घेतला असून आहे.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली. पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य चंद्रकांत बाठे, पंचायत समितीचे माजी उपसभापती मानसिंग धुमाळ, माजी सभापती वंदना धुमाळ, भोर पंचायत समितीचे उपसभापती लहू शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विचार मांडले.
यावेळी भोर तालुका राष्ट्रवादीचे सरचिटणीस रवींद्र बांदल, प्रकाश तनपुरे, नगरपलिकेचे माजी गटनेते यशवंत डाळ, भोर शहराध्यक्ष नितीन धारणे, तालुका महिला अध्यक्षा विद्या यादव, शहर महिला अध्यक्षा हसीना शेख, संदीप नांगरे, गणेश निगडे, विद्यार्थी अध्यक्ष केतन चव्हाण, जिल्हा युवक उपाध्यक्ष सुहित जाधव, शहर युवक अध्यक्ष कुणाल धुमाळ, पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन भोर युवकचे अध्यक्ष गणेश खुटवड यांनी केले. बारामती लोकसभा युवकचे अध्यक्ष स्वप्निल कोंडे यांनी आभार मानले.
—–
फोटो-
संगमनेर (ता. भोर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना खासदार सुप्रिया सुळे.