शिक्रापूर : किरकोळ वादातून पुतण्याकडून चुलत्यावर कुऱ्हाडीने हल्ला

शिक्रापूर – वरुडे (ता. शिरूर) येथे भावकीच्या किरकोळ वादातून चुलत पुतण्याने चुलत्याच्या घरात प्रवेश करुन आपल्या चुलत्याला कुऱ्हाडने घाव घालत दांडक्‍याच्या सहाय्याने मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करत खुनाचा प्रयत्न करून शेतातील साहित्यांची नासाडी करत तोडफोड केली.

याप्रकरणी बबन किसन काळे (रा. वरुडे) याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानोबा आनंदा काळे (वय 76) यांनी फिर्याद दिली. ज्ञानोबा काळे हे त्यांच्या शेतातील घरात जेवण करत बसलेले असताना अचानक बबन काळे हा आला आणि हातातील कुऱ्हाडने ज्ञानोबा काळे यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव टाकला.

ज्ञानोबा यांनी तो घाव हुकावला, त्यावेळी बबन याने लगेच लाकडी काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच घरातून बाहेर ओढत आणून पुन्हा कुऱ्हाड दाखवत मी तुला आज जिवंत सोडणार नाही, आज तुझे काही खरे नाही, तुझे कुऱ्हाडीने तुकडेच करतो, तुला मारूनच टाकतो अशी धमकी दिली. यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये ज्ञानोबा काळे हे जखमी झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.