Bangladeshi Woman Arrested: भारतात अवैधरित्या प्रवेश केलेल्या बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कडक निगराणीला चुकवत महिलेने काटेरी तारांचे कुंपण ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला होता.
यासंदर्भात त्रिपुरा पोलीस आणि प्रशासनाला माहिती मिळाली होती. फातिमा नुसरत (वय 24 वर्ष) बांगलादेशी महिलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी (27 ऑक्टोबर) ही माहिती दिली.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आसाम-त्रिपुरा सीमेवर असलेल्या फुलबारी गावातील रहिवासी नूर जलाल अनेकदा वनौषधी आणि वनस्पती खरेदी करण्यासाठी बांगलादेशला जात असे. तेथे तो बांगलादेशी महिला फातिमाच्या प्रेमात पडला. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या महिलेचे आधीच लग्न झाले होते. सुमारे 15 दिवसांपूर्वी ही महिला बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत आली आणि जलीलसोबत लग्न करण्यासाठी धर्मनगरला पोहोचली.
प्रियकर फरार –
धर्मनगर उपविभागाचे एसडीपीओ देबाशीष साहा म्हणाले, ‘नूर आणि फातिमा दोघेही फुलबारी येथे राहत होते. यासंदर्भात नुकतीच माहिती मिळाली. त्यानंतर गुरुवारी (27 ऑक्टोबर) पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, नूर जलाल फरार झाला आहे.
दरम्यान, याआधी ऑक्टोबरच्या सुरुवातीला बांगलादेशातील एक महिला तिच्या 3 मुलांसह उत्तर प्रदेशातील श्रावस्तीला पोहोचल्याचे प्रकरण समोर आले होते. जिल्ह्याच्या भारत-नेपाळ सीमेला लागून असलेल्या भरथा रोशनगढ गावातील अब्दुल करीम हा बहारीनमध्ये कामाला होता. तो TikTok च्या माध्यमातून बांगलादेशात राहणाऱ्या शर्मीच्या प्रेमात पडला होता.
प्रेम इतके फुलले की शर्मी तिच्या तीन मुलांसह त्याच्या घरी गेली. त्यावेळी अब्दुल करीमच्या पहिल्या पत्नीने विरोध केल्याने पोलिसांना माहिती मिळाली होती.