बिनविरोध निवडीला बावडा गटात “खो’

जिल्हा परिषद पोटनिवडणूक : आठ जण रिंगणात
रेडा – बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कॉंग्रेससह अनेकांनी प्रयत्न केले. परंतु, 15 जणांपैकी सात जणांनी माघार घेतली तर आठ जण निवडणुकीच्या रिंगणात असून अंकिता पाटील यांना लढत आहेत.

बावडा-लाखेवाडी गटाच्या सदस्या तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वांनीच ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अटकळ बांधली होती. तसेच, कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही निवडणूक अन्य निवडणुकी सारखी नसून सर्वांनी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले होते. मात्र, आज (शनिवारी) अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात एकही अर्ज न राहता सर्वजण माघार घेतील, अशी अटकळ बांधली गेली होती.

पण, असे न होता वैध असलेल्या 15 जणांपैकी केवळ सात जणांनी माघार घेतली आणि आठ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक बिनविरोधच काय पण एकतर्फी देखील होऊ द्यायची नाही, असा चंग बांधून आठ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. उमेदवार पुढीलप्रमाणे; दिपाली सगाजी कांबळे, दिपाली बाळासाहेब कोकाटे, नंदाबाई अभिमन्यू गायकवाड, जयश्री कमलाकांत तोरणे, अंकिता हर्षवर्धन पाटील, कांताबाई विलास बोडके, वनिता बाळासाहेब भोसले, गौरी महादेव मोहिते. दरम्यान, आजपासून प्रचार सुरू झाला असून रविवारी (दि. 23) मतदान व सोमवारी (दि.24) मतमोजणी होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.