Arvind Kejriwal on Loksabha Election 2024 – दिल्ली विधानसभेमध्ये आज सत्ताधारी आम आदमी पक्षाने विश्वास प्रस्ताव जवळपास एकमताने जिंकला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी विधानसभेच्या पटलावर विश्वास प्रस्ताव मांडला होता. प्रस्तावावर चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी, ‘२०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये जर भाजपचा विजय झाला, तर २०२९ मध्ये भाजपपासून देशाची सुटका आम आदमी पक्षचं करेल’ असं वक्तव्य केलं आहे. केजरीवाल यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
२०२४ चा विरोधकांना अंदाज? | Loksabha Election 2024
२०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये ४०० हून अधिक जागा जिंकू असा विश्वास भाजपतर्फे व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे विरोधी पक्षामध्ये मात्र अद्यापही गोंधळाचे वातावरण दिसत आहे. विरोधकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या इंडिया आघाडीला तडे गेले आहेत.
अशातच देशातील एक प्रमुख पक्ष म्हणून नावारूपाला आलेल्या आम आदमी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यानेच, २०२४ निवडणुकांचा धुराळा उडण्यापूर्वीच २०२९ निवडणुकांबाबत वक्तव्य केलं आहे. यामुळे विरोधकही २०२४ निवडणुकांच्याबाबतीत उत्साही नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘दिल्लीमध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस फेल’ | Loksabha Election 2024
तत्पूर्वी शुक्रवारी, आम आदमी पक्षातर्फे विश्वास प्रस्ताव मांडण्यामागची भूमिका स्पष्ट केली होती. ‘अनेक प्रयत्नांनंतरही ‘आप’च्या एकाही आमदाराने साथ सोडली नाही. दिल्लीमध्ये भाजपचे ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा अयशस्वी झाल्याचं विश्वास प्रस्तावातून स्पष्ट होईल.’ असं पक्षातर्फे सांगण्यात आलं होत.
‘आप’ने जिंकला विश्वास प्रस्ताव | Loksabha Election 2024
भाजप आमदार रामवीर सिंग बिधुरी यांचा विरोध वगळता मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षाच्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याने विश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ७० संख्याबळ असलेल्या दिल्ली विधानसभेमध्ये आम आदमी पक्षाचे ६२ आमदार आहेत. भाजपचे ८ आमदार असून त्यापैकी ७ निलंबित आहेत.
आम आदमी पक्षाचे ५४ आमदार आज विधानसभेमध्ये उपस्थित होते. अनुपस्थित ८ आमदारांपैकी काही कारागृहात आहेत, काही प्रवासात तर काहींची प्रकृती ठीक नसल्याचं मुख्यमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केलं.
इतर महत्वाच्या बातम्या
बिहार सरकारला यादवांचे तिसरे चाक? मोठ्या उलटफेरांच्या चर्चांवर मुख्यमंत्री म्हणतात…
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उत्तर प्रदेशात मोठे राजकीय उलटफेर! अखिलेश यादवांचे आमदार…