Bramati Loksabha 2024 – लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये इच्छूका उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून आपल्याच विचाराच्या उमेदवाराला निवडून द्या असं आव्हान अजित पवार यांनी केलं आहे. आपल्या विचाराचा खासदार निवडून न दिल्यास विधानसभा लढवणार नाही अशी तंबी देखील त्यांनी बारामतीकरांना दिली आहे.
अजित पवार यांच्या या आव्हानांवर आता शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ‘ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जात आहे, त्यांची भाषणे काहीतरी वेगळं सुचवत आहेत. त्याची नोंद समंजस मतदार घेतील आणि योग्य तो निकाल देतील’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
भावनिक आव्हानाचा मुद्दा हणून पाडला | Sharad Pawar on Bramati Loksabha 2024
अजित पवार यांनी, शरद पवार गटाकडून भावनिक आव्हान करण्यात येईल, त्याला बळी पडू नका असा सल्ला बारामतीकरांना दिला होता. याबाबतही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘भावनात्मक अपील आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही. बारामती लोकसभा मतदारसंघाचे लोक आम्हाला वर्षानुवर्षे ओळखत आहेत. त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
बारामतीमध्ये पवारांचा कौटुंबिक सामना? | Sunetra Pawar vs Supriya Sule in Bramati Loksabha 2024
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अजित पवार यांनी यापूर्वीच बारामती येथून उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. बारामती येथून आपला उमेदवार ‘नवा’ असेल असे अजित पवार म्हणाले होते. यावरून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे कयास बांधले जात आहेत.
सुनेत्रा पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यास त्यांचा सामना येथील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी होईल. त्यामुळे बारामती येथे नणंद – भावजय सामना होणार काय याकडे सर्वांचे लक्ष असेल.
इतर महत्वाच्या बातम्या | Ajit Pawar on Bramati Loksabha 2024
शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, ‘चिन्हाची चिंता नाही वेगवेगळ्या पाच चिन्हावर निवडणूका जिंकलो’
ajit pawar | अजित पवार भावूक होत म्हणाले,’…तर मी विधानसभा निवडणूक लढणार नाही’