Akhilesh Yadav MLA । लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. सपामधील फुटीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. अखिलेश यादव यांच्या पक्षातील दहा आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. तर पक्षाचे तीन आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.
आमदार अखिलेश यादवची साथ सोडणार ? Akhilesh Yadav MLA ।
राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दृष्टीकोनातूनही हा ब्रेकडाउन अखिलेश यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सपा आमदार इंद्रजित सरोज यांच्यासह सपाचे अर्ध्याहून अधिक विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. राज्यसभा निवडणुकीत भाजपला गरज पडल्यास हे सर्व आमदार सपाविरोधात क्रॉस व्होट करू शकतात.
सपाचे अमिताभ वाजपेयी यांच्यासह तीन आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. हे सर्व आमदार लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे ते इतर पक्षांची वाट धरत असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यसभा निवडणुकीतील उमेदवारांबाबत नाराजी वाढली Akhilesh Yadav MLA ।
गेल्या काही दिवसांत अखिलेश यादव यांच्या जवळच्या अनेक नेत्यांनी त्यांना धक्का दिलाय. सपा आमदार आणि अपना दल कामेरवाडीच्या नेत्या पल्लवी पटेल यांनी आधीच राज्यसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मत देण्यास नकार दिला. पीडीएच्या सूत्रावर पक्ष चालत असल्याचे त्यांनी म्हटलंय. त्यांनी सपा उमेदवार जया बच्चन आणि आलोक रंजन यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज्यसभेच्या उमेदवारांच्या नामांकनानंतर सपामध्ये बंडखोरी सुरू झालीय. याआधी सपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी उमेदवारांच्या नामांकनानंतर पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. यूपीमध्ये राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने आठ तर सपाने तीन उमेदवार उभे केले आहेत. जया बच्चन आणि आलोक रंजन यांच्याशिवाय सपाने रामजी सुमन यांना उमेदवारी दिली आहे.