Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ते निवडणुकीसाठी अर्ज भरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ 2002 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील आहे. बरोबर 22 वर्षांपूर्वी, 24 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. हा व्हिडिओ शेअर करताना पीएम मोदींनी लिहिले की, योगायोगाने ते दोन दिवस गुजरातमध्ये आहेत आणि राजकोटमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राजकोटमधूनच त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती.
‘Dekho Dekho Kaun Aaya..Gujarat Ka Sher Aaya!’
On February 24 2002, exactly 22 years ago today, @narendramodi stepped into the Gujarat Legislature as an MLA for the first time.
This victory marked the dawn of a promising new era not only for Gujarat but also for India and the… pic.twitter.com/NCHqczPjLS
— Modi Archive (@modiarchive) February 24, 2024
व्हिडिओ शेअर करताना पीएम मोदींनी लिहिले की, “माझ्या हृदयात राजकोटबद्दल नेहमीच खास स्थान असेल. या शहरातील लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला पहिल्यांदा निवडणूकीत जिंकवले. तेव्हापासून आजपर्यंत मी लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम केले. हा देखील आनंदाचा योगायोग आहे की आज आणि उद्या मी गुजरातमध्ये असेन आणि एक कार्यक्रम राजकोटमध्ये आहे. येथे मी पाच एम्स देशाला समर्पित करेन.”
मोदींनी 24 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता –
हा व्हिडिओ मोदी आर्काइव्ह नावाच्या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवास चित्रे आणि व्हिडिओंद्वारे दाखवण्यात आला आहे. या हँडलवर पंतप्रधान मोदींशी संबंधित ऑडिओ रेकॉर्डिंग, पत्रे, वर्तमानपत्रातील कटिंग्ज आणि इतर गोष्टी शेअर केल्या आहेत. पीएम मोदींचा हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे की, “आजपासून ठीक 22 वर्षांपूर्वी, 24 फेब्रुवारी 2002 रोजी, नरेंद्र मोदी पहिल्यांदा आमदार म्हणून गुजरात विधानसभेचा भाग बनले. त्यांच्या विजयाने केवळ गुजरातच नाही तर संपूर्ण देश आणि जगासाठी एका नवीन युगाची सुरुवात केली.”
आमदार झाल्यानंतर चार महिन्यांनी मोदी मुख्यमंत्री –
मोदी आर्काइव्ह हँडलवरील पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, “चार महिन्यांनंतर, भूकंपामुळे उद्भवलेल्या आपत्तीमध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. राजकीय व्यवस्थापन आणि निवडणुकीच्या वेळी पक्षाला पुढे नेण्यात ते पारंगत होते. निवडणुकीच्या अनेक घोषणा आणि रणनीती ज्यांनी 1990 च्या दशकात भाजपला राष्ट्रीय राजकारणाचा लँडस्केप बदलण्यास मदत केली. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी 14,724 मतांच्या फरकाने विजयी झाले. या विजयामुळे त्यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा आणखी मजबूत झाला होता.
पहिली निवडणूक जिंकल्यानंतर मोदी काय म्हणाले होते?
पहिली निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले होते, “अखेर राजकोटने मला आमदार म्हणून निवडून दिले आहे. मी राजकोटच्या जनतेला मला घट्ट धरून ठेवण्याचे आणि कुठेही जाऊ न देण्याचे आवाहन केले होते. मला वाटले नव्हते की, राजकोटचे लोक मला एवढ्या चांगल्या गुणांनी पास करतील.