Lok Sabha Election 2024 । कॉंग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जारी केली. त्यामध्ये राहुल गांधी, शशी थरूर, के.सी.वेणुगोपाल या प्रमुख नेत्यांना स्थान मिळाले आहे. राहुल केरळच्या वायनाडमधून पुन्हा मैदानात उतरणार आहेत. असे असले तरी लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का देत माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी, माजी खासदार गजेंद्र सिंह राजुखेडी आणि पक्षाचे माजी आमदार संजय शुक्ला आणि इतर अनेक नेत्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भोपाळ येथील पक्षाच्या मुख्यालयातील एका किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे.
भाजप नेते कैलाश विजयवर्गीय विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे विरोधक संजय शुक्ला यांना भगवा फलक लावताना म्हणतात, ‘… मी तुमची ने शिव्या ऐकल्या आहे आणि मी तुम्हालाच भाजप पक्षात घेत आहे…’
दरम्यान, 2023 च्या विधानसभा निवडणुकीत संजय शुक्ला इंदूर-1 मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसचे उमेदवार शुक्ला यांनी भाजप उमेदवार कैलाश विजयवर्गीय यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये गुन्हा नोंदवणे आणि भूमाफियांना आश्रय देणे असे आरोप निवडणूक मंचावरून केले होते. मतदानाच्या दिवशीही दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली होती.
मात्र, काँग्रेसच्या संजय शुक्ला यांचा ५७ हजार ७१९ मतांनी पराभव करून कैलाश विजयवर्गीय आमदार झाले आणि आता ते राज्यातील मोहन सरकारमध्ये मंत्री आहेत. अशात भाजप पक्षाच्या मुख्यालयात कैलाश विजयवर्गीय यांनी संजय शुक्ला यांना पक्षाचा झेंडा दाखवला आणि म्हणाले, “…मी तुमच्या शिव्या ऐकल्या आहेत, आता मी तुम्हाला पक्षात घेत आहे…” हे ऐकून संजय शुक्ला हसू लागले. भाजपचे ज्येष्ठ नेते विजयवर्गीय यांच्या पायाला स्पर्श करत म्हणाले – “मी तुमचा मुलगा आहे.” यादरम्यान विजयवर्गीय यांनी शुक्ला यांच्या पाठीवर थाप मारून त्यांना आशीर्वादही दिला.
कोण आहेत संजय शुक्ला?
संजय शुक्ला हे इंदोरच्या श्रीमंत कुटुंबातील आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात काँग्रेसचे उमेदवार शुक्ला यांनी 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली होती. 2018 च्या निवडणुकीत संजयने भाजपचे सुदर्शन गुप्ता यांचा पराभव करून विजय मिळवला. संजय शुक्ला यांचे वडील विष्णू प्रसाद शुक्ला उर्फ बडे भैय्या, जे आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत, हे भाजपचे तगडे नेते असल्याची माहिती आहे. एकप्रकारे हीच आता संजयची ‘घरवापसी’ मानली जात आहे.
हे वाचल का ?
उत्तर प्रदेशात राजकीय समीकरण बदलणार…! बसपा प्रमुख मायावती लोकसभा निवडणूक स्वबळावर ‘लढणार’